दरवर्षीप्रमाणे हजारी मठाचा गणपती व चंद्रशेखर आझाद मंडळाचा गणपती यांच्या विसर्जनाची मिरवणूक ही जामा मशीदी समोरुन रवाना होत असते त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित होऊ नये यासाठी शासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित राहतात मात्र नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे,मुस्लिम समाजाचे निजाम इंजिनिअर यांनी गणपती विसर्जन मिरवणूकित ठेका धरुन उत्साही सहभाग देऊन सामाजिक एक्याचे प्रदर्शन घडविले अशी माहिती माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे यांनी दिली.