समस्यांचे निवारण करण्याकरता मोठ्या संख्येने बोर्डा ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित होते. परंतु सरपंच उपसरपंच व इतर पाच सदस्य गैरहजर असल्यामुळे मासिक सभा तहकूब झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांना विचारणा करून धारेवर धरले परंतु ग्रामसेवकाने ग्राम विस्तार अधिकाऱ्याने सुद्धा उडवा उडवीचे उत्तर दिल्यामुळे संतप्त महिला पुरुष ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला काल दि 21 जुलै ला 11 वाजता कुलूप लावत ग्रामसेवकाला आत कोंबले.