मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अखेर विजयी झाले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा सेवकांनी विजयाचा गुलाल उधळत गावी परतण्याचा आनंद व्यक्त केला. बुधवारी मुंबईहून परतलेल्या आंदोलकांच्या स्वागतासाठी लिंबागणेशच्या मुख्य चौकात गावकऱ्यांनी आतषबाजी, गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा केला. जरांगे पाटलांचे फलक डोक्यावर घेऊन, गाणी वाजवत, जल्लोष केल