खासदार प्रफुल पटेल हे दि. ३१ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी सायं. ६ ते रात्री ८ वा. दरम्यान भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशिर्वाद घेतले. या प्रसंगी गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) येथे जाऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन...