भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील दवडीपार (खापा) जंगल शिवारात दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री 9.40 वा. दरम्यान राजेंद्र जाधव बांते वय 30 रा. मौदि हे स्कुटी क्र. MH 36 AP 2925 ने भंडाऱ्यावरून स्वगावी जात असता दवडीपार खापा जंगल शिवाराजवळ अचानक स्कुटी समोर रानटी डुक्कर आडवा आल्याने त्यांची स्कुटी अनियंत्रित होऊन रोडवर आदळली. त्यात राजेंद्र यांच्या चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.