तासगाव विटा मार्गावरील शिरगाव हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वार ठार झाला आहे. या भीषण अपघातात महेश दिनकर पाटील ( वय ४० रा. आळते तालुका तासगाव ) हे जागीच ठार झाले. या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महेश पाटील हे (एम एच दहा ए एस ३११० ) ह्या दुचाकीवरून आळते होऊन तासगावच्या दिशेने निघाले होते. तर शिरगाव हद्दीतील गायकवाड यांच्या घरासमोर आल्यानंतर तासगाव कडून विटाच्या दिशेने निघालेल्या एका अज्ञात वाहनाचे धडकेत दुचाकी वर