सासरच्या घराजवळील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला आहे. सोनाली वनवे असे या महिलेचे नाव आहे. तिच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते. मात्र पती आणि सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून तिने आपले जीवन संपवल्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा या ठिकाणी राहणाऱ्या सोनाली बाळू वनवे (२०) हिचा विवाह दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्याशी झाला होता. लग्नाचे सनई-चौघडे वाजले. दोन्हीही घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं.