लातूर:- या सरकारने शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.सोयाबीनचा भाव साडेतीन हजाराच्या पुढे जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणणारे मुख्यमंत्री सध्या गप्प बसले यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. बळीराजा होरपळा जात आहे मराठा आरक्षणाची दग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली असून सुद्धा या सरकारला हे दिसत कसं नाही या सरकारला जाग करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे आंदोलन करण्यात आले.