अक्षय अरुण ढोरे वय २९ वर्ष राहणार खरब ढोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पूर्वी राजेंद्र ज्ञानेश्वर ढोरे वय ५६ वर्ष यांचे सात एकर सामुहिक शेत असून गत दोन दिवसाआधी अतिवृष्टीचा पाऊस पडल्यामुळे त्यांचे शेत खरडून गेले तसेच सततची नापिकी व शेतावरील कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला कलम १९४ भारतीय न्याय संहिता नुसार आकस्मात मृत्यू नोंद केली .