बहाळ या गावात हिरालाल दशरथ ढोले वय ५६ हे आपल्या घरी होते. दरम्यान ते आपल्या घरातील वरील मजल्यावर पत्री खोलीत गेले आणि तेथे लोखंडी पाईपला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने मेहूणबारे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.