वाल्मीक कराडने परळीमध्ये कमीत-कमी २५ जणांची हत्या केली आहे, आता आणखी एका १४ वर्षीय मुलाचा खून झाला आहे', असा धक्कादायक दावा बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे, त्याचा खून झाली आहे की काय? असेही कासले यांनी म्हटले. हे सगळं आता मी पुराव्यानिशीच बोलणार आहे. सरकारने माझे खोटे गुन्हे परत घेतले, तर मी पुरावे द्यायला तयार आहे', असे रणजीत कासले म्हणाले आहेत. तो एका व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होता.