यावल शहरातील बाबूजी पुरा भागात पाच वर्षीय बालकाची सलून व्यवसाय करणाऱ्या शेख शाहिद वय २२ या तरुणांनी निर्घूण हत्या केली. या हत्याच्या निषेधार्थ शहरातील जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, सलून व्यवसायिक संघटना, मुस्लिम खलिफा न्हावी बांधव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अनिल चौधरीसह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.