दि. 10 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास नवीन पुलावरून मयत नामे साईनाथ प्रकाश नुन्नेवार वय 30 वर्ष याने आत्महत्या केली होती त्यास राजश्री नुन्नेवार, अनिता पांचाळ, शंकर पांचाळ, योगेश पांचाळ यांनी संगणमत करून 50 हजाराची मागणी करत पैसे न दिल्याने धमक्या देत मानसिक शारीरिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केले होते. या प्रकरणी फिर्यादी संगीता प्रकाश नुन्नेवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इतवारा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.