घरफोडीतील एकाला नाशिकरोड पोलिसांनी नवले चाळ ब्रिजखाली अटक करून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पो.उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विमल सूर्यभान कुऱ्हे राह.पळसे यांचे घराजवळ किरण दुकान आहे.घराला कडी लावून नेहमीप्रमाणे किराणा दुकानात गेलेल्या असताना घराची कडी खोलून कपाटातील 16 लाख रुपये किमतीचे 15 तोळे दागिने चोरून नेले.शुभम विकी मोरे याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने नवले चाळ ब्रिजखाली अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.