अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या चिंचोली बु येथील अल्पभूधारक शेतकरी संजय भवराव घोगरे वय (५६) यांनी स्वतःच्या शेतामध्ये निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७:३० दरम्यान उघडकीस आली.अल्पभूधारक शेतकरी असलेले संजय भवराव घोगरे कर्जबाजारी असल्याने आर्थिक अडचणीत होते. त्यांच्यावर गावातील नॅशनल बँकचे कर्ज असल्याचे समजले असून अल्पभूधारक असल्याने उत्पन्न कमी आणि दवाखाना,घर खर्चामुळे आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्या केली.