मिरजेत दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा मजुरे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अश्या मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली तर्फे आज २८ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता देण्यात आले आहे. यावेळी, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा उपाध्य