यावल तालुक्यात पाडळसा हे गाव आहे. या गावात एका ३५ वर्षीय महिलेला सुरेश कचरे हा बोलला की तुझा नवरा आता मेला आहे व तू मजेत आहे असे सांगून महिलेला त्याने डोळा मारला आणि अश्लील कृत्य केले. तेव्हा मुलींनी याचा जाब विचारला असता त्या रागातून तिला सुरेश कचरे, निर्मला कचरे,गोविंदा कचरे व मनोज कचरे यांनी मारहाण केली. तेव्हा या चार जणाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.