रोडच्या कडेला शेळ्या पाणी पित असतांना त्याठिकाणी आलेल्या एका मोटारसायकल स्वाराने बाजूला घे म्हणत वृध्दाशी हुज्जत घातली. त्यानतर कुऱ्हाडीचा दांडा त्या वृध्दाच्या डोक्यात घातला. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव होऊन वृध्दाचा मृत्यूझाल्याची दुर्देवी घटना उपळी (ता. वडवणी) शिवारात घडली. वडवणी तालुक्यातील उपळी येथील शेख इब्राहीम शेख बासू (वय ६०) हे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारीत असतांना रोड लगत असलेल्या एका डोहामध्ये शेळ्या पाणी पित होत्या.