गांधीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत पूर्व वैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात विठ्ठल कृष्णा पवार वय 65 यांचा मृत्यू झाला.शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.विठ्ठल पवार हे इंदिरानगर झोपडपट्टीत कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांचे पुतणे निलेश पवार यांनी शेजारी राहणाऱ्या युवतीशी प्रेमविवाह केल्यामुळे दोन कुटुंबांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद होता.