शासनाने महा डीबीटी पोर्टल अंतर्गत 100% अनुदान तत्त्वावर कृषी विभागाने सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांना दिले होते, त्याची पेरणी केली असता झाडांना शेंगा लागल्या नाही ज्या शेंगा लागल्या त्या भरन्या-पूर्वीच गळत आहेत या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची चौकशी करून कार्यवाही करावी तसेच शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते इर्शाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यां निवेदनाद्वारे आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 30 वाजता करण्यात आली.