हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांनी आज मंगळवारी सकाळी 8 वाजता शाहूवाडी येथील सरूड गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी सत्यजित पाटील म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांनी शांततेत जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज 7 मे रोजी मतदार पार पडत आहे.