पनवेल महानगरपालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. नागरिकांना होत असलेल्या या त्रासाची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवावेत या मागणी करता महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत बुधवारी खड्डे सफारी चे आयोजन करून अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात यमराजाच्या वेशातील सामील झालेल्या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.