भंडारा नगर परिषद क्षेत्र अंतर्गत च्या एकूण १६ हजार ४०० घरांचे सर्वे करण्यात येणार असून हा सर्वे तब्बल ११२ वर्ष नंतर करण्यात येणार आहे. या सर्वे करिता लागणारा अंदाजित खर्च ३ कोटी ४० लक्ष इतका असून नगर परिषद भंडारा द्वारे तत्काळ १ कोटी रुपये भरून सर्वे सुरु करण्याचे निर्देश आम. नरेंद्रे भोंडेकर यांनी दिले. आज दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान भंडारा नगर परिषद येथे आमदार भोंडेकर यांच्या द्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.