पोलीस स्टेशन कारधा येथील पोलीस पथक दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील करचखेडा फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना टिप्पर क्रमांक एमएच 32 एजे 2413 च्या चालक व मालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर मध्ये विना पास परवाना अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणांना मिळून आले. आरोपी टिप्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातून टिप्पर व पाच ब्रास रेती असा एकूण किंमत 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.