औंढा नागनाथ येथील रहीम चौक येथून दिनांक 10 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली यानंतर शहरातून मोठा जुलूस काढण्यात होता सदरील जुलूस रहीम चौक सोनार गल्ली गुजरी बाजार मार्गे काढून दर्गाह परिसरात विसर्जित करण्यात आला यावेळी नगरसेवक आजू इनामदार, फारुखपाशा इनामदार, वखारुद्दीन इनामदार, अजिज कादरी, रफिक कुरेशी, नदीम पिंजारी,जुनैद बाबा, वसीम इनामदार, शाबू खतीब, अलीम खतीब, मुशरब कादरी, सह इतरांची उपस्थिती होती.