बचत गटाच्या नावाखाली महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील गणेशपुर येथे उघडकीस आला आहे. यात 32 लाख रुपयांच्या कर्जाची उचल करण्यात आली असून 34.06 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2021 ते 18 जुलै 2025 या कालावधीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी 3 महिलांवर भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा शहरातील म्हाडा कॉलनी येथील दीपिका रामलाल ठाकूर वय 45 या महिलेचे गणेशपूर येथे श्रुतिका ब्युटी पार्लर आहे.