30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा निवेदनातून इशारा उबाठा शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे. पिक विमा कंपनीतर्फे तालुक्यात पिक विमा मंजूर झालेला असताना सुद्धा अद्याप पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक मा जमा झालेला नाही त्यामुळे अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.