ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या बीड जिल्हा दौऱ्याला आज गेवराईत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गेवराई शहरात प्रवेश करताच ओबीसी बांधवांनी हाके यांचे भव्य-दिव्य आणि जंगी स्वागत करून आपली ताकद दाखवून दिली. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गल्लीबोळांतून हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभाग नोंदवत काढलेली मोठी रॅली हे लक्ष वेधून घेणारे ठरले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे गेवराई शहरात एक उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.