एका पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली. याप्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कैलास सरवदे (वय ३७ वर्ष, राहणार क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे मृत पतीचे नाव आहे. कैलासची बहीण ज्योती तरकसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास याचे सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी लग्न झाले होते.