उदळी बुद्रुक या गावाच्या शेतशिवारात दुचाकी क्रमांक एम. एच.१९ डी.सी.४१९१ द्वारे गौरव पाटील व त्याचा भाऊ कुणाल पाटील हे जात होते. दरम्यान प्रेम संबंधाच्या रागातून गोपी उर्फ सुशील सुभाष पाटील यांनी पांढऱ्या रंगाचे चार चाकी वाहन आणून त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यांना ठार मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.