महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाच्या नांदेड येथील पथकाने आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जिंतूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.याबाबत पथकाकडून जिंतूर बस स्थानक परिसराच्या स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच काही त्रुटींबाबत बसस्थानक प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या.