औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा येथील शेतकरी सोपान उर्फ राजू शामराव राठोड वय 35 वर्ष या तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या नावे बँकेचे पीक कर्ज शेतातील उत्पन्नामध्ये खर्च तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च होत नसल्याने दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी शेतातील लिंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शामराव चतुर राठोड यांनी दिलेल्या खबरी वरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक 12 ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे .