अकोल्यात ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवरून गोंधळ उडाला होता या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.. ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीदरम्यान औरंगजेब इब्राहिम गाझीच्या पोस्टरवर आठ ते दहा अनोळखी इसमांनी दुग्धभीषेक केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तर याच मिरवणुकीत काहींनी औरंगजेबाचे पोस्टर फिरवल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.