कसबे डिग्रज मध्ये तिहेरी अपघातात ७५ वर्षीय दिनकर नारायण कुरकुटे या वृद्धाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. अपघात करून गाडी चालक पसार झाला आहे. हा अपघात शनिवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ वाजता झाला. याप्रकरणी नवल दिनकर कुरकुटे ( वय ३० रा.आपटे मळा कसबे डिग्रज ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी (मयत) दिनकर कुरकुटे हे शनिवारी रात्री साडे आठ वाजता त्याचे एम एच १० डी एन ९३९६ ह्या जुपिटर गाडी वरुन सागंली हुन कसबेडिग्रज कडे येत होते.