माण तालुक्यातील वडजल येथील कारंडेवाडी फाट्याजवळील विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवाईडींग या दुकानामध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी चोरी करून सुमारे १ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीची ही घटना दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जगन्नाथ पुकळे रा. पुकळेवाडी, ता. माण यांनी फिर्याद दिली आहे.