अनंत चतुर्दशीच्या दिवशी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छ गणेश विसर्जन उपक्रमाला नगरवासी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. मनपा प्रशासनाच्या पुढाकाराने शहरभर २३ ठिकाणी उभारलेल्या आर्टीफिशीयल टँक व्यवस्था नागरिकांच्या भेटीस आली असून विशेषतः छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे विसर्जनासाठी प्रचंड गर्दी आज ६ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी साडे बारा वाजता पाहायला मिळत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पंक्ती लावून, आपापल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन करण्यासाठी नियोजित व स्वच