नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती/सुचना अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. सदर सुनावणी दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून आयोजित करण्यात आली असून राजीव गांधी भवन कार्यालय येथे पार पडणार आहे.