राज्य सरकारकडून माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये परत करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करूनही याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. न्यायव्यवस्था व राज्य सरकार दोघेही चालढकल करत असल्याचा संशय वाटू लागला असल्याने याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास लवकरच वनताराचे प्रमुख अनंत अंबानीच्या अंटालिया समोर ठाण मांडून बसणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली.