अमरावती येथील अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती तालुक्यातील रुधाडी शिवारात चुकुण भरकटलेली स्थानिक शेतकरी यांना आढळली.सिंधी समाजातीलअनिल ददवाणी असं नाव सांगणाऱ्या त्याव्यक्तीस रुधाडी येथील विलास येउलकर यांच्या शेतात पत्रकार राजेश डांगटे व सहकाऱ्यांनी थांबवुन ठेऊन अकोट शहरातील सिंधी बांधवांशी संपर्क करत त्यांच्या नातेवाईकां पर्यंत संदेश पोहचावत त्यांच्या घरी पोहचवण्यात मदत केली पत्रकार डांगटे व येऊलकर यांच्या सजगतेमुळे भरकटलेली व्यक्ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले