मंगरूळ दस्तगीर बायपास रोड टी पॉईंट वर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते करिता प्रशासनाकडून त्या ठिकाणी सोलर लाईट लावण्यात आला होता. परंतु तो लाईट अज्ञात चोरट्याने चोरून बॅटरी, वायर, काढून चोरून नेल्याचे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आले. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अंधार असतो त्या कारणाने वाहनांचे अपघात होऊ शकते करिता प्रशासनाने त्या ठिकाणी सोलर लाईट लावला होता. मात्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोलर लाईट चा पाईप आरिने कापून केबल ,लाईट, बॅटरी चोरून नेले.