आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान बोरगाव तेलंग लगत असलेल्या नदीपात्रात इंजीनच्या सहाव्याने अवैधरित्या रेती उपसा आरोपी सुनील श्रीसागर वय वर्ष 35 पोलीस पथकास पाहून पळून गेला नदीपात्रामध्ये उडी टाकून पात्राच्या पलीकडे पोहत पळून गेला. लिमगाव पोलिसांनी अवैध सहा तराफे तीन लाख रुपयाचे हे डिझेलच्या साहय्याने जाळून जागीच नष्ट करण्यात आले आहेत. एक इंजिन सह सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन निमगाव पोलीस आरोपी सुनील शिरसागर विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.