शहरातील कार्ले प्लॉट व समता नगर परिसरात नव्या पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी रस्ते खोदण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे परिसरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुले यांना वावरणे कठीण झाले असून नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरीकांनी दि.३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता नगरपरिषद कडे केली आहे.तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला आहे.