जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पावसादरम्यान उघड्या वायरीचा करंट लागून दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यापैकी सैय्यद समीर सैय्यद अय्यूब (29) याचा मृत्यू झाला, तर मोहम्मद असलम मोहम्मद अनीस गंभीर असून त्याच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आमदार साजिद खान पठान तात्काळ रुग्णालयात दाखल झाले व जखमीच्या उपचाराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या घटनेने महावितरणच्या निष्का