चोपडा तालुक्यात चहार्डी हे गाव आहे.या गावात गुजर पुरा हा परिसर आहे. या परिसरातील रहिवासी नारायण रामदास पाटील वय ७६ यांचे घर पावसाच्या पाण्यात व वादळात कोसळले आणि त्याखाली दाबले जाऊन ते जागीच ठार झाले. तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे आणण्यात आले होते.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.