तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल येथे दि. 28 ऑगस्ट रोज गुरुवारला सकाळी 11 वा.च्या सुमारास तुमसर महसूल पथकाचे अधिकारी तुषार कावळे यांनी विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र. MH- 36 -Z -1159 याला ताब्यात घेतले. दरम्यान सदर ट्रॅक्टर सिहोरा पोलिसात जप्त करण्यात आला असून आरोपी ट्रॅक्टर चालक-मालक महेंद्र रहांगडाले याच्याविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.