सरकार मायबाप तुम्हाला कितीदा रडू रडू सांगावं लागेल, बघा हिंग गोदावरीच्या नदीने माझे वावर बुडाले होते, अद्यापही कोणता अधिकारी पंचनाम्यासाठी आलेला नाही, नुसता हिरवा पाळा राहिला असून शेंग काय लागली नाही याकडे आमदार महोदयांनी लक्ष द्यावे असे म्हणत आमच्या तोंडाला आलेला घास गेला, माय बाप सरकारने बघा हिंग म्हणत चोळाखा येथील शेतकरी संतोष लक्ष्मण कदम याने व्हीडिओ व्हायरल करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हीडिओ आजरोजी संध्याकाळी 6 पर्यंत चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.