मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शेत शिवारातून सोलर पॅनलचा कंट्रोल बॉक्स चोरीला गेल्याची घटना दि. 31 जुलै रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी हरिदास कुंभलकर रा. डोंगरगाव असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपला शेतात सोलर पंप बसविले असता अज्ञात आरोपींनी सोलर पॅनलचा कंट्रोल बॉक्स चोरून नेला. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.