कमलाकर ,सुधाकर , ऋषिकेश मेश्राम राहणार तिघेही मांजरखेळ हे सख्खे भाऊ असून शेजारी शेजारी राहतात .वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाल्यापासून त्यांच्यात वाद आहे. कमलाकर कामावरून घरी आल्यावर त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे उठा ले रे भगवान असे म्हटले .तेव्हा आम्हालाच पाहून तू असे म्हणतो म्हणून सुधाकर व ऋषिकेश यांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ऋषिकेशने लाकडी काठीने डोक्यावर झोडपा मारला अशी तक्रार कमलाकर ने चांदुर रेल्वे पोलिसात दिली आहे. दोन जनाविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे