कडबा रचण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाला विट मारून त्याचे डोके फोडण्यात आले. ही घटना जिंतूर शहरातील जवाहर शाळेजवळ घडली.रामराव हारके यांनी तक्रार दिली आहे. आरोपीनी फिर्यादीला कडबा रचण्याच्या कारणावरून डोक्यात विट मारून डोके फोडत जखमी केले. या प्रकरणी रामराव हारके यांच्या फिर्यादीवरून पंडित रोकडे यांच्यावर आज सोमवार दि 15 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता जिंतूर पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.