दहिगाव या गावात इम्रान पटेल वय २१ या तरुणाची गावाबाहेर विरवली रोडवर ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी यांनी हत्या केली होती. शुक्रवारी हत्या करून ते यावल पोलिसात हजर झाले होते. दरम्यान उसनवार दिलेले पैसे पटेल परत करीत नव्हता या रागातून आपण तेच हत्या केल्याची पोलिसांकडे या दोघांनी कबुली दिली आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी पत्रकारांना दिली.